Ajit Pawar On Sharad Pawar Retirement: 'काही लोक 84 व्या वर्षीही पद सोडायला तयार नाहीत': अजित पवार यांची ठाण्यातील कार्यक्रमात काका शरद पवार यांच्या निवृत्तीवर बोचरी टीका
परंतु असे काही लोक आहेत, जे वयाची 84 वर्षे ओलांडूनही निवृत्त होण्यास तयार नाहीत,' असं अजित पवार यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हटलं आहे.
Ajit Pawar On Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निवृत्तीवरून बोचरी टीका केली. 'महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होतात. परंतु असे काही लोक आहेत, जे वयाची 84 वर्षे ओलांडूनही निवृत्त होण्यास तयार नाहीत,' असं अजित पवार यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हटलं आहे.
अजित पवारांचा जरंगे-पाटील यांना इशारा -
यावेळी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना इशारा देत अजित पवार म्हणाले की, 'कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा सुरू आहे. काही लोक आपली मागणी मांडण्यासाठी मुंबईत येणार आहेत. परंतु, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास कुणालाही सोडले जाणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.' (हेही वाचा - Ajit Pawar Troll On PhD: काय दिवे लावणार? अजित पवार ट्रोल, विरोधकांकडून चेष्टेचा विषय)
निवृत्तीबाबत शरद पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवासांपूर्वी आपल्या निवृत्तीसंदर्भात विधान केलं होतं. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, 'सगळ्यांच्या भाषणात मी 83 वर्षांचा झालो, 84 वर्षांचा झालो असं म्हटलं जातं. पण तुम्ही अजून माझं काय बघितलंय. मी म्हातारा झालेलो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काहीच चिंता करु नका.' (हेही वाचा - NCP-Ajit Pawar गटाचे दिल्लीत नवे कार्यालय सुरू; Praful Patel यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video))
दरम्यान, अजित पवार आणि इतर आठ आमदार एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी 2 जुलै रोजी फूट पडली. त्यानंतर अजित पवार यांनी अनेकदा थेट शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच शपतविधीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले.