#Khar Building Collapse Update: खार मध्ये पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून पडली 10 वर्षीय चिमुकली

खारमधील एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खार रोडवरील पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला असून या ढिगा-याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Khar Building collapsed (Photo Credits: ANI)

खार (Khar) मधील एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खार रोडवरील पूजा अपार्टमेंट (Pooja Apartment) इमारतीचा काही भाग कोसळला. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार या ढिगाऱ्याखाली माही मोटवानी (Mahi Motvani) नामक एक दहा वर्षीय बालिका अडकून पडली आहे. ही घटना घडताच ताबडतोब ही इमारत खाली करण्यात आली असून तूर्तास या ठिकाणी एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या साहायाने बचावकार्य सूरु आहे. तूर्तास तरी या घटनेत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झाली नसली तरी या मातीच्या ढिगाऱ्याखाली माही सह अन्य काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ANI चे ट्विट:

हेही वाचा- Bhiwandi Building Collapse: भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू

ANI  ट्विट:

ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा अपार्टमेंटच्या जिन्याचा काही भाग खार रोड क्रमांक 17 वर कोसळला. या इमारतीतील रहिवाशांनी सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तसेच इमारतीचा काही भाग कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दुपारच्या सुमारास अचानक ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now