सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द

जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.

Solapurs bjp mp Jaisiddheshwar Mahaswamijis (PC - Twitter)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (Jay Siddheshwar Swami) यांचे जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटले आहे. जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं जयसिद्धेश्वर यांनी म्हटलं आहे.

जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर यांनी त्यावेळी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. जयसिद्धेश्वर यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. 15 फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली होती. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाला लाभ?)

दरम्यान, जयसिद्धेश्वर स्वामी यांनी जोडलेली कागदपत्र बनावट असल्याचं दक्षता समितीने म्हटलं आहे. तसेच जयसिद्धेश्वर यांनी या प्रकरणाचा त्रयस्थ समितीमार्फत तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर यांचा अर्ज फेटाळून लावत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif