तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करणार्‍या बेपत्ता रेश्मा पडकेनूर यांचा मृतदेह सापडला; पोलिस तपास सुरु

कर्नाटक येथील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या रेश्मा पडकेनूर यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी सोलापूरातील नगरसेवक तौफीक शेख यांच्याविरुद्ध विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. तेव्हापासून रेश्मा बेपत्ता होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कोलार येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.

तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर याउलट रेश्मा यांनी तौफिक शेख यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या रेश्मा यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार, हत्या नेमकी कशी झाली हे स्पष्ट होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement