Nitesh Rane and T Raja Singh Booked for Hate Speech: सोलापूर येथे चिथावणीखोर वक्तव्य; भाजप आमदार नितेश राणे आणि टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल
सोलापूर (Solapur) येथील 'हिंदू जन आक्रोश' रॅलीमध्ये (Hindu Jan Aakrosh Morcha) द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि टी. राजा सिंह (T Raja Singh) यांच्यासह इतरांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर (Solapur) येथील 'हिंदू जन आक्रोश' रॅलीमध्ये (Hindu Jan Aakrosh Morcha) द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि टी. राजा सिंह (T Raja Singh) यांच्यासह इतरांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहरात रविवारी (8 जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीत या दोघांनी अतिषय प्रक्षोभक विधाने केली. ज्यामळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) म्हटले आहे.
नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या भाषणात "जिहादी" आणि मशिदी पाडल्याचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे, हैदराबादमधील गोशामहलमधील विधानसभेचे सदस्य (आमदार) टी. राजा सिंह यांनी "लव्ह जिहाद" बद्दल आक्षेपार्ह विधाने केली असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Navratri 2023 On Garba, Dandiya: नवरात्री गरबा, दांडीयामध्ये आधार कार्ड पाहून केवळ हिंदूंनाच प्रवेश मिळावा- भाजप आमदार नितेश राणे)
राणे, सिंह यांच्यासह आठ ते ते दहा जणांवर गुन्हे
सोलापूर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये राणे, राजा सिंह, सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी सुधाकर महादेव बहिरवाडे आणि इतर सुमारे आठ ते दहा जणांवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणात उद्धृत केलेल्या कलमांमध्ये 153A (दोन भिन्न धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), 295A (धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) यांचा समावेश आहे. रॅलीदरम्यान द्वेषपूर्ण भाषणे करण्यात सहभाग घेतल्याबद्दल व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा भाग म्हणून एफआय आरकडे पाहिले जात आहे. (हेही वाचा, T Raja Singh in Preventive Custody: भाजपचे निलंबीत आमदार टी राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, हनुमान जयंती मिरवणुकीपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई)
विरोधकांकडून नाराजी
नितेश राणे आणि टी राजा यांच्या वक्त्यव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दोन समाजात तेढ निर्मण होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. खास करुन सत्ताधारी वर्गातील लोकांनी आणि आमदरांनी जाहीर व्यासपीठावरुन अशी वक्तव्य करु नयेत. ज्यामुळे सामाजिक एकोप्यास ठेच पोहोचेल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोलापूर येथील काही स्थानिक नेत्यांनी राणे यांची वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे त्यांना सरकारने तातडीने कारवाईक करत अटक करावी, अशी मागणी केली आहे.
सकल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्यावतीने वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, यसह हिंदुत्वाच्या इतर मुद्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी राणे यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, मोर्चावर दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. सदर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलीस पुढील कारवाई काय करतात याबाबत उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)