तुळजाभवानीच्या खजिन्यातील 71 पुरातन नाणी गायब
महाराष्ट्रातील सोलापूर स्थित आणि कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या खजिन्यामधील 71 पुरातन नाणी आणि मौल्यवान वस्तू गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर स्थित आणि कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या खजिन्यामधील 71 पुरातन नाणी आणि मौल्यवान वस्तू गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, तुळजाभवानी मंदिरात देवीसाठी निजाम, औरंबजेब, पोर्तुगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर यांसारख्या विविध राज घराण्यातून नाणी देण्यात आली होती. या नाण्याची नोंद मंदिराच्या संस्थांच्या रेकॉर्डमध्ये 1980 पर्यंत होती. मात्र 2005 आणि 2018 मधील अहवालात या 71 नाण्यांचा खुलासा करण्यात आला. त्यामुळे चोरी झालेल्या नाण्यांमुळे मंदिरात काळाबाजार सुरु असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.(Bhiwandi Vajreshwari Temple Theft: वज्रेश्वरी देवी मंदिरात चोरांचा डल्ला, दानपेटी लुटून काढला पळ)
यापूर्वी पुजारी मंडळांचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि शिरिष कुलकर्णी यांनी माहिती अधिकाऱ्यांकडे मंदिरातील मौल्यवान वस्तूंची नोंद घेण्यासाठी दप्तराची मागणी केली होती. त्यामधून हा प्रकार उघडकीस आला आहे.