Solapur Airport: येत्या 26 सप्टेंबर रोजी PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन; लवकरच सुरु होणार पुणे, मुंबईसाठी विमान सेवा

नोव्हेंबरअखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूर-मुंबई उड्डाणाला उशीर झाल्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Flights | (Photo Credit - X/ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर काही दिवसांतच सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले. सोलापूर-मुंबई सेवा सुरू करण्यापूर्वी पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. ही सेवा कंपनी 'Fly91' द्वारे प्रदान केली जाईल आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) योजनेअंतर्गत सुरू होईल. विमान कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्यास राज्य सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अहवालानुसार, भारताच्या विमान उद्योगातील सर्वात नवीन जोड असलेले FLY91 हे एक प्रादेशिक वाहक आहे. ही विमान कंपनी भारतातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून हवाई कनेक्टिव्हिटी वाढवू इच्छित आहे. आता ही कंपनी पुणे-सोलापूर विमान सेवा सुरु करेल. यामध्ये प्रवाशांना तिकिटावर सबसिडीही दिली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूर-मुंबई उड्डाणाला उशीर झाल्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सोशल मिडियावर सांगितले की, सोलापूर विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि या प्रकल्पासंदर्भात नवी दिल्ली येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विमानतळाच्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कामाची स्थिती आणि तांत्रिक बाबींचाही आढावा घेण्यात आला, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Pune Airport New Name: पुणे विमानतळाचे नाव बदलले; आता ओळखले जाणार 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी)

बैठकीत सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-हैदराबाद मार्गांवर सेवा सुरू करण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. या सेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी वेगाने हालचाली होत असून, सोलापूरवासीयांना लवकरच हवाई सेवा उपलब्ध होईल. यापूर्वी मोहोळ यांनी नमूद केले की, केंद्राने विमानतळाच्या सुधारणेसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement