Sindhutai Sapkal Passes Away: वर्धा मधील 'चिंधी' ते 2021 च्या पद्मश्री विजेत्या 'अनाथांची माय' सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची अशी होती संघर्षमय कहाणी!

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

Sindhutai Sapkal | PC: Twitter/ Nnarendra Modi

अनाथांची माय अशी ओळख असणार्‍या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं आज हृद्यविकाराच्या झटक्याने पुण्याच्या गॅलेक्सी रूग्णालयात निधन झाले आहे. मागील महिन्याभरापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ उतार होत होते. नुकतेच त्यांच्यावर हर्नियाचे देखील ऑपरेशन झाले होते. पण त्यांची प्रकृती गंभीर ढासळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यानच त्यांची आज रात्री 8 च्या सुमारास प्राणज्योत मालवली. आबालवृद्धांसाठी प्रेरणा असणारं वात्स्ल्स्पूर्ण व्यक्तिमत्त्व आज या जगातून निघून गेले आहे. पण त्यांचं संघर्षमय जीवन कायम प्रत्येकाला सकारात्मकता देणारं आहे. लहानपणापासूनच परिस्थितीशी दोन हात करत राहिलेल्या सिंधुताईंच्या आयुष्यातील जाणून घ्या काही संघर्षमय गोष्टी. नक्की वाचा: Sindhutai Sapkal Last Rites: पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना .

माई म्हणून अनाथांची माय बनलेल्या सिंधुताईंनी 2 हजाराहून अधिकांना मायेचा हात दिला. अनेकजण आक डॉक्टर, वकील झाले आहेत. पुढे स्थिती सुधारली तशी त्यांची ख्याती जगभरात पोहचली. माईंना 270 पेक्षा अधिक पुरस्काराने नावजलं आहे. 2021 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.