Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी

कट ऑफ जीन्स, स्कर्ट, तोकडे कपडे, अंगप्रदर्श्न करणारे कपडे, अयोग्य पोशाख परिधान करणाऱ्यांना गणपतीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Siddhivinayak Temple | X

मुंबई मध्ये गणेशभक्तांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरामध्ये (Siddhivinayak Ganapati Temple) आता दर्शनाला जायचं असेल तर ड्रेसकोड (Dress Code) लागू होणार आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहे. जारी ड्रेसकोड मध्ये भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घालणं अनिवार्य आहे असे सांगण्यात आले आहे. एबीपी माझा च्या रिपोर्ट्स नुसार, ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांच्या माहितीनुसार, हा ड्रेसकोड पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरामध्ये मंदिराचं पावित्र्य राखलं जाईल आणि अन्य भाविकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करून यावं असे आवाहन केले जाणार आहे. इतरांना संकोचल्यासारखे वाटेल किंवा तोकडे कपडे घालून येणार्‍यांना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. नक्की वाचा: Siddhivinayak Mandir Viral Video: मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याच्या वायरल व्हिडिओ वर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; 'प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न म्हणत आरोप फेटाळले (Watch Video) .

सिद्धिविनायक मंदिरात कोणाला प्रवेश नसेल?

कट ऑफ जीन्स, स्कर्ट, तोकडे कपडे, अंगप्रदर्श्न करणारे कपडे, अयोग्य पोशाख परिधान करणाऱ्यांना गणपतीचे दर्शन घेण्याची  परवानगी दिली जाणार नाही. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

देशा-परदेशातून भाविक प्रभादेवी येथी स्थित सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येतात. अनेकदा काही भाविक इतरांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करतात त्यामुळे मंदिर प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई करत आता सिद्धिविनायक मंदिराकडूनच ड्रेसकोड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement