Shramik Special Trains: लॉकडाऊनमुळे वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अडकून पडलेले बिहारमधील 1 हजार 019 मजूर पटनाकडे रवाना
लॉकडाऊनमुळे वर्धा (Wardha) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात अडकून पडलेले बिहारमधील 1 हजार 019 मजुरांना घेऊन वर्ध्या येथून श्रमिक स्पेशल ट्रेन पटनाकडे रवाना झाली आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी पाठविण्यासाठी 'श्रमिक स्पेशल ट्रेन' (Shramik Special Train) सुरु करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे वर्धा (Wardha) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात अडकून पडलेले बिहारमधील 1 हजार 019 मजुरांना घेऊन वर्ध्या येथून श्रमिक स्पेशल ट्रेन पटनाकडे रवाना झाली आहे. त्यावेळी पालकमंत्री सुनिल केदार, खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून टाळ्यांच्या कडकडाटात मजूरांना निरोप दिला आहे. देशात पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे शहरात अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत विशेष श्रमिक ट्रेनची सेवा सुरु करण्यात आली आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी, तसेच सरकारांमध्ये समनव्य राहावा, यासाठी राज्य यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यांत अडकलेल्या परराज्यांतील मजुरांच्या प्रश्न लॉकडाउनपासून चर्चेत आहे. लॉकडाउनमुळे मूळ गावी निघालेले लाखो मजूर अनेक राज्यांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यात अडकून पडले आहेत. दरम्यान, देशात 6 श्रमिक स्पेशल ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहेत. लिंगमपल्ली ते हटिया, अलुवा ते भुवनेश्वर, नाशिक ते भोपाळ, जयपूर ते पटना, नाशिक ते लखनऊ, कोटो ते हटिया अशा ट्रेनची सरकारकडून सोय करण्यात आली आहे. हे देखील वाचा- मुंबईची प्रसिद्ध राणीची बाग आता डिजिटल स्वरूपात; युट्यूब चॅनेल आणि ट्विटरच्या माध्यमातून जिजामाता उद्यान-प्राणीसंग्रहालयाला 'व्हर्च्युअल' भेट देणे शक्य
ट्विट-
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भारतात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढू लागल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत 49 हजार 391 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 183 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात एकूण 15 हजार 525 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात 617 लोकांचा मृत्यू झाली आहे. तर, 2 हजार 819 जणांनी कोरोनावर मात केली आहे.