Two Children Drown In Nagpur: धक्कादायक! गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू; नागपूर येथील घटना

ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नरखेड (Narkhed) तालुक्यात आज घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन विद्यार्थांचा तलावता बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नरखेड (Narkhed) तालुक्यात आज घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नरखेड तालुक्यातील जंगलात मच्छी तलाव आहे. या तलावात पोहोण्याचा मोह या दोन शालेय विद्यार्थ्यांना आवरता आला नाही आणि ते दोघेही तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शाळा बंद असून सर्वांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे.

गजानन चचान आणि नुतेश घाटवडे असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही दोघंजण शेजारच्या जंगलामध्ये गुरे चरण्यासाठी गेले होते. दरम्यान, दोघेही नरखेड तालुक्यातील मच्छी तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरे चारण्यासाठी गेलेले दोघे विद्यार्थी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोधाशोध सुरू केली. त्यावेळी दोघांची सायकल तलावाशेजारी आढळून आली. त्यानंतर तलावात शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह सापडले. हे घटनेने संपूर्ण नागपूर परिसरातील पालकवर्गात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. देखील वाचा- Ramkrushna Baba Patil Passed Away: माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे औरंगाबाद येथे निधन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑगस्ट महिना उटलून गेला तरी अजूनही शाळा बंदच आहेत. शाळा-महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय घेईल.