Husband Kills His Wife: धक्कादायक! पुणे येथे चारित्र्याच्या संशयावरून दुसऱ्या पत्नीची हत्या; पतीला अटक

ही घटना पुणे (Pune) जिल्ह्याच्या हडपसर (Hadapsar) परिसरातील भेकराईनगर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची विचारपूस सुरु आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

चारित्र्याच्या संशयावरून दुसऱ्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची महिती उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्याच्या हडपसर (Hadapsar) परिसरातील भेकराईनगर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची विचारपूस सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी ही घरकाम करत होती. मात्र, दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करण्यास आरोपीचा विरोध होता. यामुळे आरोपी सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे दोघात नेमही भांडण होत व्हायचे. या वादातूनच आरोपीने आपल्या पत्नीच्या हत्या केल्याचे उघड झाले आहे.

सुरेंद्र साळुंखे असे आरोपीचे नाव आहे. सुरेंद्र पहिले लग्न झाले असताना कॉलेजमधील मैत्रीण अपर्णा महाडिक हिच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांनी लग्न केले. सुरेंद्रची पहिली पत्नी आणि अपर्णा या दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या. मात्र, सुरेंद्र हा अपर्णासोबत राहत होता. परंतु, अपर्णाने घरकाम केलेले सुरेंद्र आवडत नसे. याच कारणामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. या वादातूनच सुरेंद्रने अपर्णाचा गळा आवळून तिची हत्या केली आहे, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा-मुंबई: आईस्क्रीमच्या खरेदीवर ग्राहकांकडून 10 रुपये अधिक घेतल्याने एका रेस्टॉरंटला 2 लाखांचा दंड

हडपसर पोलीसांमी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला होता. मात्र, काही तासांतच हडपसर पोलिसांनी आरोपी सुरेंद्रला अटक केली. चौकशी केली असता खून आपणच केल्याची कबूली त्याने दिली आहे.