गोंदिया: शाळेत घुसून शिक्षिकेवर कुऱ्हाडीचे घाव; पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार
दरम्यान, प्रतिभा यांचा पती दिलीप डोंगरे हा देखील त्यांच्या पाठोपाठ शाळेत पोहोचला. कुणाला काही ध्यानात यायच्या आधीच दिलीप याने प्रतिभा यांच्या डोळ्यांत मिरची पुड फेकली आणि पुढच्या काही क्षणांच त्याने प्रतिभा यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यास सुरुवात केली.
शाळा (School) कार्यालयात घुसून शिक्षिकेवर कुऱ्हाडीने घाव घालत तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना गोंदिया ( Gondia) जिल्ह्यात घडली आहे. प्रतिभा डोंगरे असे मृत शिक्षिकेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे प्रतिभा डोंगरे यांची हत्या त्यांचा पती दिलीप डोंगरे यानेच केली. गोंदिया जिल्ह्यातील इर्रीटोला गावात हा प्रकार केला.
प्राप्त माहितीनुसार, प्रतिभा डोंगरे या नेहमीप्रमाणे आज (2 जुलै 2019) सकाळी नोकरीचे ठिकाण असलेल्या आपल्या शाळेत पोहोचल्या. दरम्यान, प्रतिभा यांचा पती दिलीप डोंगरे हा देखील त्यांच्या पाठोपाठ शाळेत पोहोचला. कुणाला काही ध्यानात यायच्या आधीच दिलीप याने प्रतिभा यांच्या डोळ्यांत मिरची पुड फेकली आणि पुढच्या काही क्षणांच त्याने प्रतिभा यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यास सुरुवात केली. कुऱ्हाडीचे घाव मानेवर आणि डोक्यावर वर्मी लागल्याने प्रितभा या जागीच कोसळल्या. (हेही वाचा, धक्कादायक! मार्कांची स्पर्धा भोवली, चुलत भावाने शिक्षकासोबत मिळून बहिणीवर केला सामूहिक बलात्कार)
घडला प्रकार शाळेतील इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या ध्यानात आला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांनी जोरजोराने ओरडण्यास सुरुवात केली. दरम्यान, कर्मचारीही काही क्षण गोंधळून गेले. याच संधीचा फायदा घेत दिलीप डोंगरे याने घटनास्थलावरुन पळ काढला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आरोपीचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, शाळेत भरदीवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.