Amednagar News: धक्कादायक, मांजर वाचवण्याच्या नादत पाच जणांनी गमावला जीव, अहमदनगर येथील घटना
मांजर बाचवण्याच्या नादात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Amednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मांजर वाचवण्याच्या (Cat Rescue) प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नेवासात दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातील चार जणांनी आपला जीव गमावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा- जन्मदात्या आईवडिलांकडून बाळाची हत्या, ठाण्यातील संतापजनक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली आहे. या गावात एक बायोगॅसच्या विहिरीत मांजर पडली होती. ती मांजर बाचवण्यासाठी एक जण बायोगॅसच्या विहिरत उतरला होता. विहिरी जवळ काम करत असलेला बबलू काळे विहिरीत उतरला होता. मात्र, काही वेळाने त्याचा पाय घसरला आणि तो शेणाने भरलेल्या विहिरीत पडला. तो बुडाला आणि त्याला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी वडिल अनिल काळे, काका मणिक काळे, चुलत भाऊ संदीप काळे आणि तिथे उपस्थित काम करणारे शेत मजूर बाबासाहेब गायकवाड हे देखील विहिरीत उतरले.
मात्र, दुर्दैवाने हे सर्व जण विहिरीत बुडाले. एकाचा ही जीव वाचू शकला नाही. सुदैवाने ती मांजर जीवंत असल्याचे बोलले जात आहे. ती एका कोपऱ्यात बसली आहे. येथून ती स्वत:चा जीव बाचवण्याचा प्रयत्न करत आहे. वाकडी गावात या घटनेमुळे शोक पसरला आहे.