आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली मध्ये 1 रुपयांत पेट्रोल; नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)
त्यामुळेच आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत आज अवघ्या एका रुपयांत एक लीटर पेट्रोल दिले जात होते.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे त्रासलेल्या नागरिकांना आज दिलासा देण्याचा शिवसेनेचा (Shivsena) विचार होता. त्यामुळेच आज (13 जून) पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत (Dombivali) अवघ्या एका रुपयांत एक लीटर पेट्रोल दिले जात होते. डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर (Usma Petrol Pump) सकाळी 10 ते 12 या वेळेत 1 रुपयांत पेट्रोल मिळत होते. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी डोंबिवलीकरांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडिया माध्यमांत वेगाने पसरु लागला आहे.
डोंबिवलीनंतर अंबरनाथ (Ambernath) येथे पेट्रोल 50 रुपये प्रति लीटरने विकले जात होते. अंबरनाथ पश्चिमेकडील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर (Vimco Naka Petrol pump) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 50 रुपयांत पेट्रोल विकले जात होते. कल्याण युवा सेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी 1 रुपयांत पेट्रोल या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. तर अंबरनाथ मध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 50 रुपयांत पेट्रोल देऊन नागरिकांना दिलासा दिला.
पहा व्हिडिओ:
दरम्यान, मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.