Washim Fighting Video: शिवपूरच्या जैन मंदिरात दोन गटात हाणामारी, काही जण जखमी, व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत काही जण जखमी झाले आहे. सुरुवातीला दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले.

Washim Fighting Video PC TWITTER

Washim Fighting Video:वाशिम जिल्ह्यातील शिवपूरच्या जैन मंदिरात दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत काही जण जखमी झाले आहे. सुरुवातीला दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. (हेही वाचा- जमिनीच्या वादातून दोन गटात वाद, घरात घुसून कुटुंब सदस्यांना मारहाण,2 महिला जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार,  वाशिम जिल्ह्यातील शिवपूरच्या जैन मंदिराच्या बांधकामाविषयी दोन गटात हाणामारी झाली. श्वेतांबर आणि दिंगाबर गटात सुरुवातीला बाचाबाची झाली होती. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही गटांनी मंदिरातच लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले. अनेकांनी मद्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.शिवपूर जैन मंदिर यांचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरु असताना, श्वेतांबर गटाकडून मंदिरातील पार्श्वनाथ मुर्तीची विंटबना होत असल्याचे आरोप दिंगबर गटाकडून करण्यात आला. या गोष्टीवर दोन्ही गटात काही दिवसांपासून वाद सुरु होता अशी माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली.

मंदिरातच दोन्ही गट आमने सामने भिडले. या घटनेत काही लोक जखमी झाले आहे. तात्या भैया असं एका जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.