शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका; काँग्रेस नेते कपिल सिब्बल मांडणार शिवसेनेची बाजू
राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे चिन्हं दिसू लागल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. राष्ट्रपती राजवटीला आव्हान दिल्यानंतर बाजू मांडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क सुरू केला आहे, अशी माहिती नुकतीच हाती आली आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा अवधी न दिल्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
(हेही वाचा - राज्यपाल हे भाजपचे बाहुले आहेत का? सचिन सावंत यांचा सवाल)
राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपाला निमंत्रण दिलं होतं. परंतु, भाजपने त्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं. सोमवारी रात्री शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला. परंतु, राज्यपालांनी त्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. त्यानुसार, राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेस आज रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, त्याआधीच राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. शिवसेनेने केलेली याचिका (Petition) पहा येथे
राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. परंतु, राज्यापालांनी त्यास नकार दिला. त्यामुळे आता शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी दाखवली आहे.