Shiv Sena-NCP Alliance: 'महाराष्ट्र हितासाठी शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल', महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षाचा काँग्रेसला सूचक इशारा

याबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व शरद पवार ( Sharad Pawar) यांनी केलेच आहे, अशी आठवण करुन देत सामना संपादकीयातून काँग्रेसला इशारा देण्यात आला आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये घटक पक्ष असलेलेल्या काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाबाबत भाष्य केले. यावर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamna Editorial) संपादकीयातून काँग्रेसला सूचक इशारा देत भाष्य करण्यात आले आहे. भाजपनेही या आधीच महाराष्ट्रात स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस भाजप यांच्यासारखे पक्ष जर स्वबळावर लढत असतील तर महाराष्ट्र हितासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र (Shiv Sena-NCP Alliance) विचार करुन लढावेल लागेल. याबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व शरद पवार ( Sharad Pawar) यांनी केलेच आहे, अशी आठवण करुन देत सामना संपादकीयातून काँग्रेसला इशारा देण्यात आला आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

दरम्यान, शिवसेना-भाजप हे एकमेंकाचे मित्रपक्ष. गेली अनेक वर्षे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात युतीद्वारे लढत होते. गेल्या काही काळात त्यात वितुष्ट आले आणि हे दोन्ही पक्ष स्वतंत्र झाले. तेव्हापासून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार कुरघोडी करत असतात. काल (16 जून) शिवसेना भवन कार्यालयासमोर झालेला राडाही त्यातलाच प्रकार होता, असे राजकीय अभ्यासक सांगतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif