Shiv Sena MP Sanjay Raut on Possible Alliance With BJP: भाजपा सोबत शिवसेनेच्या हातमिळवणीच्या चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया!
शिवसेना कॉंग्रेस- एनसीपीच्या पाठीत खंजीर खूपसणार नाही. असं संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (17 सप्टेंबर) औरंगाबाद मध्ये बोलताना 'माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी' असा उल्लेख केल्यानंतर भाजपा- शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत. पण त्यासोबतच शिवसेनेचं कॉंग्रेस-एनसीपी सोबत जमत नाही का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या सार्यावर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना 'शिवसेना 5 वर्ष सत्तेमध्ये राहण्यासाठी आणि शिवसेनेकडून कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला जाणार नाही' असं सांगण्यात आलं आहे. नक्की वाचा: CM Uddhav Thackeray Statement: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपला ऑफर की NCP, काँग्रेला इशारा? 'त्या' विधानावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क.
'जर कोणाला मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून 'आनंदाच्या उकळ्या' फूटत असतील तर 3 वर्ष थांबा. शिवसेना कॉंग्रेस- एनसीपीच्या पाठीत खंजीर खूपसणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला आहे.
ANI Tweet
काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना 'उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल' असं म्हटलं आहे.