Sanjay Raut on Maharashtra Government: राज्यात सरकार नाही.. महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये.. राज्यपाल आता कुठे आहेत? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल

राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) वाऱ्यावर आहे, असे असताना राज्याबद्दल आतीव प्रेम असलेले राज्यपाल आता कोठे गेले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

Shiv Sena MP Sanjay Raut on Maharashtra Government : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि विद्यमान राज्य सरकार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि उपमुख्यमंत्री याच्या शपथविधीनंतर राज्यात नवे सरकार अस्तित्वात येऊनही अजून मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही. मुळात हे सरकारच बेकायदशीर आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) वाऱ्यावर आहे, असे असताना राज्याबद्दल आतीव प्रेम असलेले राज्यपाल आता कोठे गेले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आज मुंबई दौऱ्यावरआहेत. या दौऱ्यात त्या विविध राजकीय पक्ष आणि आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या 'मातोश्री' (Matoshree) येथे जाणार का? याबाबत उत्सुकता आहे. अर्थात मुर्मू यांना शिवसेनेने आगोदरच पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता संजय राऊत यांनी म्हटले की, द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर येणार की नाही याबाबत माहिती नाही. परंतू, शिवसेना एनडीएत नाही. केवळ आदिवासींप्रती असलेल्या प्रेमापोटी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा असा त्याचा अर्थ काढू नये. शिवसेना एनडीएत नाही, असेही राऊत यांनी पुनरुच्चार करत सांगितले. (हेही वाचा, Blow To Uddhav Thackeray Camp: देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे यांना देणार धक्का, मुंबई महापालिका निवडणुकीत होणार शिवसेनेची अडचण)

शिवसेनेने यापूर्वी एनडीएत असताना प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची ही परंपरा आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष किंवा आघाडी पाहून पाठिंबा देत नाही. तर उमेदवार पाहून देतो, असेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. आताही शिवसनेने 'आदिवासींप्रती असलेल्या भावनेपोटी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. हिच आमची इच्छा आहे आणि आमची आदिवासी समाजाविषयीचा आदर आणि भावनेपोटी हा निर्णय आम्ही घेतला. राजकारणापलिकडे जाऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे', असे संजय राऊत म्हणाले.