Peru Baug Land Case: किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांचा पेरुबाग जमीन घोटाळ्याचा आरोप, देवेंद्र फडणवीस यांना मात्र क्लिन चिट
किरीट सोमय्या हे स्वत:च्याच चपलेने स्वत:लाच मारतील. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील लोक त्यांचे कपडे काढून धिंड काढणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (17 फेब्रवारी) आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या हे स्वत:च्याच चपलेने स्वत:लाच मारतील. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील लोक त्यांचे कपडे काढून धिंड काढणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. किरीट सोमय्या हे दलाल आहेत. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. अर्थात, देवेंद्र फडणवीस यांचा यात काहीही सहभाग नसेल, असे मला वाटते असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना क्लिन चिट दिली.
किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पवई येथील पेरुबाग जमीन प्रकरणात बोगस पद्धतीने 433 लोकांना घुसवले आहे. या लोकांकडून किरीट सोमय्या यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोगस सह्या करत तसेच अमित शाह यंच्या नावानेही सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सुमारे 200 ते 300 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे संजय राऊत यांनी दावा केला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut: संजय राऊत यांचा सूचक इशारा, 'बाप बेटे जेल मध्ये जाणार!')
देवेंद्र फडणवीस असे काही करणार नाहीत. परंतू, त्यांना आपल्या मागे काय चालले आहे याची माहिती नसावी असे मला वाटते आहे. पण, त्यांच्या नावाने हा घोटाळा झाला असावा. याबाबतची सर्व कागदपत्रे मी संबंधित तपास यंत्रणांना दिली आहेत. याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या प्रकाराची माहिती देणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात घडलेला महाआयटी घोटाळा हा धक्कादायक आहे. या घोटाळ्यातील आरोपींना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्या प्रमाणेच पळवून लावले गेले आहे. या घोटाळ्यातील सूत्रधार असलेले अमोल काळे आणि इतर लोक कुठे आहेत? असा आमचा केंद्र सरकारला सवाल आहे. तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर 'मनी लॉण्ड्रिंग' झाले असल्याचा आरोपही संज राऊत यांनी केला आहे.