MP Sanjay Mandlik Corona Positive: शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह कुटुंबातील 2 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
याशिवाय त्यांच्या कुटुंबातील 2 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 आमदार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
MP Sanjay Mandlik Corona Positive: शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील 2 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 आमदार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
सध्या संजय मंडलिक यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंडलिक यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली आहे. दरम्यान, यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. (हेही वाचा - Tukaram Mundhe Corona Positive: नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोना विषाणूची लागण)
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी रात्री १२ ते आज रात्री बारापर्यंत कोरोनाचे 465 नवीन रुग्ण आढळून आले. तर 781 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 19 हजार 801 इतकी झाली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. काल 14 हजार 299 रुग्ण बरे झाले तर 11 हजार 15 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते 72.47 टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण 5 लाख 02 हजार 490 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 68 हजार 126 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.