Shiv Sena on Lockdown: दिल्लीश्वारांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे 'कोरोना' स्पर्श करीत नसेल - शिवसेना

काळजी घ्या नाहीतर लॉक डाऊन व कडक निर्बंध अटळ आहेत असे वातावरण तयार झाले आहे, असे शिवसेना मुखपत्र दै. सामाना संपादकीयातून म्हटले आहे.

Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

कोरना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) आदी मुद्द्यांवर शिवसेनेने विरोधी पक्षावर जोरदार टोलेबाजी केली आहे. शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Saamana Editorial) ही टोलेबाजी करण्यात आली आहे. 'पुन्हा लॉक डाऊन? टाळता आले तर बघा!' या मथळ्याखाली लिहीलेल्या संपादकीयात म्हटले आहे की, 'मुंबईत कोरना वाढला त्याचे खापर 'लोकल ट्रेन्स'वर फोडले जात आहे. तसे असेल तर दिल्लीतही 'मेट्रो' सुरु आहेत. लोकांनी स्वयंशिंस्त पाळायला हवी. स्वत:वरच काही निर्बध घालून जगायला हवे. पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, गृहमंत्री शहा 'रोड शो' करतात म्हणून ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना नाही. लोकांनी स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच होवी. दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे 'कोरोना' स्पर्श करीत नसेल, पण सामान्य जनांचे तसे नाही. काळजी घ्या नाहीतर लॉक डाऊन व कडक निर्बंध अटळ आहेत असे वातावरण तयार झाले आहे.'

सामना संपादकीयात पुढे म्हटले आहे की, प्रशासनाने अेक भागात अंशत: लॉक डाऊन सुरु केले. ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागात कोरोनाचे 'हॉट स्पॉट' निर्माण झाले. विदर्भ-मराठवाड्यातील अनेक भागात चिंता वाटावी अशा पदधतीने कोरोना उसळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांत लोकांनी गर्दी केली. बाजार, मॉल्स, लग्न समारंभात निर्बंध पाळले नाहीत. मंदिरे उघडायला लावली. लोकल ट्रेन्स सुरु करण्याचा आग्रह धरल्यांळे कोरोना वाढला, असे जे बोलले जात आहे ते खरे मानले तर प. बंगालमधील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय? असा सवाल विचारतानाच पंतप्रधान मोदी, अमित शाह, ममता बॅनर्जी, डावे पक्ष यांच्या सभांना, पदयात्रांना 'मास्क' वैगेरे न लावता, शारीरिक अंतर न पाळता गर्दी होत आहे, असेही सामनात म्हटले आहे. (हेही वाचा, Narendra Modi Stadium: 'गरज सरो; पटेल मरो!'; सामना संपादकीयातून शिवसेनेचे भाजपवर जोरदार टीकास्त्र)

दरम्यान, महाराष्ट्रात आकडे लपवले जात नाहीत व इतर राज्यांत अशा आकडे नोंदीची कोणतीच व्यवस्था नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोरनाचे 19 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. हरयाणात कोरोना गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि पंजाबात हे आकडे रोजच वाढत आहेत. त्यापैकी तामीळनाडू व केरळात निवडणुका आहेत. प. बंगालमध्ये कोरोनाचा तसा जोर नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले जात आहे. बहुधा पंतप्रधानांच्या सभा, भाजप नेत्यांचे भव्य प्रचार दौरे सुरळीत पार पडेपर्यंत कोरोना प. बंगालमध्ये नाही, असे सांगितले जाईल, असा टोलाही सामना संपदकीयातून लगावण्या आला आहे.