Shiv Sena On Devendra Fadnavis: पहिली ताण घेताच देवेंद्र फडणवीस यांना टीकेची उबळ- शिवसेना

कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले,' अशा शब्दात शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना टोला लगाला आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते 'फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले' असा टोला शिवसेनेने लगावला आहे. शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Dainik Saamana Editorial) संपादकीयातून ही टीका करण्यात आली आहे.

'शास्त्रीय गायनात 'डिजे', महाराष्ट्रात आणिबाणी' या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. या लेखात म्हटले आहे की, 'ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. “अठरा दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा?, महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला.'

याच संपादकीयात शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, 'फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले,' अशा शब्दात शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना टोला लगाला आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020 Results: भाजपला पुन्हा सुतक, चंद्रकांत पाटील यांची खुमखुमी चांगलीच जिरली- शिवसेना)

दरम्यान, विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.कायद्याची चौकट मोडू नये. त्या चौकटीत सगळ्यांना बसवायचे आहे. फेकूचंदांनी हे समजून घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत निर्णय दिले. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असेल तर विधिमंडळाबाहेर सरकारविरोधी नृत्यालाप करून काय होणार? , असा सवाल विचारत गोपीचंद पडळकर यांच्यावरही सामना संपादकीयातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.