Shiv Sena MLA Nitin Deshmukh: गुजरात पोलिसांकडून जबरदस्ती, शरीरात इंजेक्शन्स घुसवली; एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेले शिवसेना (Shiv Sena) आमदार नितीन देशमुख (Shiv Sena MLA Nitin Deshmukh) महाराष्ट्रात परतले आहेत. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेले शिवसेना (Shiv Sena) आमदार नितीन देशमुख (Shiv Sena MLA Nitin Deshmukh) महाराष्ट्रात परतले आहेत. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेल्यावर आपल्याला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी गुजरात पोलिसांनी आपल्यावर जबरदस्ती करण्यात आली. तसेच, गुजरात येथील रुग्णालयात आपल्या शरिरात उपचारांच्या नावाखाली इंजेक्शन्स खुपसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. आपल्यासोबत असे वर्तन करताना त्यांचा काय हेतू होता हे आपल्याला कळले नसल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.
नितीन देशमुख यांच्या पत्नीने आपले पती बेपत्ता असल्यीच तक्रार दाखल केली होती. तसेच, त्यांच्यावर कोणतातरी दबाव असल्यानेच त्यांना परत येऊ दिले जात नसल्याचा आरोपही देशमुख यांच्या पत्नीने केला होता. दरम्यान, नितीन देशमुख यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत आपण सुरक्षीत असल्याचे म्हटले होते. अखेर ते आता महाराष्ट्रात परतले आहेत. नागपूर विमानतळावर दाखल होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. इतर आमदारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: आम्हाला 46 आमदारांचा पाठिंबा, राजीनामा द्यायचा की नाही हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय- एकनाथ शिंदे)
ट्विट
#WATCH | Shiv Sena MLA Nitin Deshmukh - who returned to Nagpur from Surat - says, "...100-150 Policemen took me to a hospital & pretended as I've suffered an attack. They wanted to operate on me, harm me under that pretext. By God's grace, I'm alright. I am with Uddhav Thackeray" pic.twitter.com/r1uSOMK0IS
— ANI (@ANI) June 22, 2022
नितीन देशमुख यांनी पुढे बोलताना म्हटले की, आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे कारण देत रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मला कोणत्याही प्रकारे हृदयविकाराचा झटका नव्हता. मात्र, गुजरात पोलीस आणि वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा हेतू आपल्याला सांगला वाटला नाही. 20-25 लोकांनी मला पकडून ठेवले आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या शरीरामध्ये इंजेक्शन टोचले. ते कोणते होते हे मला माहिती नव्हते. मात्र, माझ्यावर काहीतरी चुकीची प्रक्रिया करण्याचे त्यांचे षडयंत्र मला स्पष्ट दिसत होते, असेही नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2022 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

