IPL Auction 2025 Live

Shiv Sena MLA Ramesh Latke Passes Away: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबई येथे निधन, पार्थिव मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु

ते 52 वर्षांचे होते. लटके हे काही कामानिमित्त कुटुंबीयांसह दुबईला गेले होते. तेथेच त्यांचे निधन (Ramesh Latke Passes Away) झाले. दुबईमध्ये आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.

Shiv Sena MLA Ramesh Latke

शिवसेना (Shiv Sena) आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. लटके हे काही कामानिमित्त कुटुंबीयांसह दुबईला गेले होते. तेथेच त्यांचे निधन (Ramesh Latke Passes Away) झाले. दुबईमध्ये आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. लटके यांना बुधवारी रात्री हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. त्यातच त्यांना अचानक झटका आला आणि त्यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते खरेदीसाठी गेले होते. त्याच वेळी ही घटना घडली अशी माहिती आहे.

रमेश लटके यांचे पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. लटके यांचे जाणे हे शिवसेनेसाठी मोठा धक्का मानले जात आहे. त्यांच्या निधनानंतर 'दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक उमदं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार रमेश लटके जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली', अशा शब्दात शिवसेनेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (हेही वाचा, शिवसेनेकडून Uddhav Thackeray च्या सभेच्या टिझर मध्ये Raj Thackeray यांच्या सभेतील गर्दीचे फोटो' मनसे प्रवक्ते Gajanan Kale यांचा दावा)

लटके यांना 1996 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढचे काही वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. त्यानंतर शिवसेनेने त्यांना बढती देत 2014 मध्ये विधानसभा तिकीट दिले. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत लटके यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्येही पक्षान लटके यांनाच तिकीट दिले. त्याही वेळी लटके हे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केले होते.