शिवसेनेला मोठा धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आज महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर होणार होते. परंत, अशातच अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार शिवसेनेवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, खोतकर यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा (Minister of State Resigns) दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आज महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर होणार होते. परंतु, अशातच अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार शिवसेनेवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, खोतकर यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकणारे सत्तार यांनी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची साथ सोडून शिवबंध बांधले होते. महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळाची घोषणा केली. परंतु, यात अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी या नाराजीतून राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (हेही वाचा - अखेर ठरलं! महाविकाआघाडी सरकारचे खातेपाटप उद्या; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडूनही हिरवा कंदील)
अब्दुल सत्तार यांचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. सत्तार यांनी कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून या मतदारसंघात राजकीय वर्चस्व निर्माण केलं.