Maharashtra Government Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदित्य ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता; विधानभवन परिसरात रंगणार शपथविधी सोहळा
त्यांनी आमदारकी मिळवल्यानंतर आता त्यांच्यावर मंत्रीपदाचीदेखील जबाबदारी पडू शकते.
Maha Vikas Aghadi Cabinet Expansion: शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान यामध्ये 36 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान यामध्ये शिवसेना आमदार आणि ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचादेखील समावेश होऊ शकतो. मीडीया रिपोर्ट्सनुसार आज आदित्य ठाकरे देखील मंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान त्यांना कॅबिनेट मंत्रीपद की राज्यमंत्रीपद दिले जाणार याबाबत खुलासा करण्यात आला नाही. इथे पहा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे लाईव्ह अपडेट्स.
आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुहुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी आमदारकी मिळवल्यानंतर आता त्यांच्यावर मंत्रीपदाचीदेखील जबाबदारी पडू शकते. दरम्यान नागरी विकास आणि शिक्षण हे दोन विषय आदित्य ठाकरे यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे याच्याशी संबंधित काही खात्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांना मिळू शकते. CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: अजित पवार पुन्हा होणार उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार.
दरम्यान आज शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, अनिल परब यांच्यासह 11 जणांची नावं मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात दिसू शकतात. यामध्ये शिवसेनेला साथ देणार्या 3 अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. यासोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार देखील शपथ घेणार आहेत.