Shiv Sena Manifesto 2019: शिवसेनेने  'वचननामा' जाहीर केला पण आरे संबंधित एकही शब्द नाही

याच पार्श्वभुमीवर शिवसेनेने भाजप सोबत युती करत यंदाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. तर आज शिवसेने विधानसभा निवडणूकीसाठी वचननामा जाहीर केला.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)
महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोंबरला पहिल्याच टप्प्यात पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेने भाजप सोबत युती करत यंदाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. तर आज शिवसेने विधानसभा निवडणूकीसाठी वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये शिवसेनेने 10 रुपयात भरघोस जेवण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मांडला आहे. मात्र शिवसेनेने ज्या आरे जंगलातील वृक्षतोड केली त्याबाबत एकाही शब्दाने उल्लेख केला नाही आहे.  तर मुंबईतल्या आरे कॉलनीमधील जवळजवळ 2141 झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी  पक्षाचा वचननामा शनिवारी जाहीर केला. आदित्य ठाकरे यंदा वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. परंतु मेट्रो कारशेड प्रोजेक्ट बाबत विचारण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले की,आम्ही आरे कॉलीन उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला विरोध करतच राहणार आहोत. मा्त्र गेल्या आठवड्यात आरे कॉलीनीमधील झाडे कापण्यावरुन जोरदार आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे तेथे कल 144  लागू करण्यात आला होता. तसेच काही जणांना अटक सुद्धा केली होती.आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन जबरदस्त विरोध केला होता.(Shiv Sena Manifesto 2019: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर; सत्तेत आल्यावर देणार 10 रुपयात थाळी, 1 रु. मध्ये आरोग्य तपासणी)
विधानसभा निवडणूकीबाबत शिवसेना-भाजप महायुती बाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील 288  जागांपैकी 164  जागा भाजाप आणि शिवसेनाला 124  जागा देण्यात आल्या आहेत. आरे मुद्द्यावरुन सरकारच्या विरोधासह शिवसेनेवर ही टीका करण्यात आली.  मुंबईतील काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेनेकडे महापालिका असून त्यांनीच आरे वृक्षतोडीला परवानगी दिली. शिवसेना फक्त बोलून आणि फक्त दाखवण्यापूर्ती आरेचा मुद्द्यावर  नाराजी व्यक्त करतात असा आरोप लावला आहे.