शिवसेना नेते संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
तर रुग्णालयात असतानाच राजकीय पक्षाच्या विविध नेतेमंडळींनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गेल्याच आठवड्यात दोन ब्लॉक आढळू आल्याने अँजिओप्लास्टी करण्यात आली. तर रुग्णालयात असतानाच राजकीय पक्षाच्या विविध नेतेमंडळींनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा संजय राऊत लीलावती रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल झाले आहेत. तर रुग्णालयात दाखल असतानाच राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्याचा परिस्थितीत सुद्धा त्यांनी तेथून आपले काम सुरुच ठेवले होते. संजय राऊत यांनी त्यांची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ट्वीट करत असे म्हटले होते की, "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती । या ओळी ट्विटमध्ये लिहीत सोबतच' हम होंगे कामयाब.. जरूर होंगे...
सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात संजय राऊत यांची भूमिका विशेष ठरली होती. भाजपाशी राजकीय संघर्ष असो वा अन्य पक्षांशी सुरु असणाऱ्या वाटाघाटी राऊत यांनी शिवसेनेचा गाडा हाकत पुढाकार घेतला होता. या दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ट्विट्सच्या रूपात त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले होते. तर आजचे राऊत यांचे ट्विट हे शिवसेनेचे आमदार व कार्यकर्ते यांचे धैर्य वाढवण्याच्या दृष्टीने असल्याचे दिसत आहे.('मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही'- संजय राऊत)