Milind Narvekar: 'लघु सुक्ष्म दिलासा', नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळताच मिलींद नार्वेकर यांचे खोचक ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेना (Shiv Sena) नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता खोचक ट्विट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये 'लघु सुक्ष्म दिलासा!' असा खोचक मजकूर पाहायला मिळत आहे. मिलिंद नार्वेकर यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Milind Narvekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना संतोष परब हल्ला प्रकरणात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेत्यांकडून बोलक्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (Shiv Sena) नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता खोचक ट्विट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये 'लघु सुक्ष्म दिलासा!' असा खोचक मजकूर पाहायला मिळत आहे. मिलिंद नार्वेकर यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि त्यांचे शिवसेनेतील अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या टीप्पणीवर राणे कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या प्रमाणेच शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, 'केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असो अथवा इतर कोणीही असो. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कायदा हा सर्वांनाच समान असतो हे सिद्ध झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही संतोष परब यांच्यावरील हल्ला जीवघेणा असल्याचे मान्य केले आहे, केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असला म्हणून कोणालाही धमकावण्याचा हक्क तुम्हाला मिळत नाही', अशा शब्दात वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा, No Anticipatory Bail to Nitesh Rane: नितेश राणे यांना दणका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन)

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना मोठा दणका दिला आहे. नितेश राणे यांना पोलिसांना शरण येण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नितेश राणे यांच्यासाठी जिन्हा न्यायालयासमोर शरण यायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे यांना कोणताही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले. याच आदेशात सर्वोच्च न्यायालयाने पुढे निर्देश दिले की, नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील एकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात ट्रायल कोर्टासमोर शरण जावे आणि नियमित जामीन घ्यावा.

ट्विट

ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात. अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारच्या बाजूने खटला लढवला. दोन्ही वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now