Lok Sabha Election 2019: शिवसेना पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील या दोन नव्या चेहर्‍यांना संधी; पहा कोणाचं तिकीट कापलं

या पहिल्या यादीमध्ये 21 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये 19 जुनेच चेहरे असून दोन नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

Shiv Sena 1st List of Candidates For Lok Sabha Elections 2019

भारतीय जनता पक्षापाठोपाठ (BJP) आज शिवसेनेकडून (Shiv Sena) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीमध्ये 21 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये 19 जुनेच चेहरे असून दोन नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. उस्मानाबाद (Osmanabad) लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील (Hemant Patil)  यांना लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे. Lok Sabha Elections 2019: शिवसेना पक्षाची पहिली 21 उमेदवार यादी जाहीर, पालघर आणि सातारा या दोन जागांवर तिढा कायम

शिवसेनेने कापलं खासदार रविंद्र गायकवाड यांचं तिकीट

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचं प्रकरण यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये भोवल्याचं चित्र आहे. खासदार रविंद्र गायकवाड पुणे-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत होते. बिझनेस क्लासचं तिकीट काढून इकॉनॉमी क्लासमध्ये बसवल्याच्या वादात मारहाण झाली होती. मीडियानेही हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पुढे काही काळ एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करण्यावर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता शिवसेनेने रविंद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निंबाळकरांना खासदारकीसाठी तिकीट दिले आहे. तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक

ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव असून शिवसेनेचे आमदार आहेत.  पद्मसिंह पाटील यांच्या घराणं विरुद्ध निंबाळकर अशी तगडी स्पर्धा इथे पहायला मिळणार आहे.

 

लोकसभा निवडणूकीसाठी यंदादेखील भाजपा आणि शिवसेनेची युती आहे. 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजपा लढणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक देशात 4 टप्प्यांमध्ये होणार असून मतमोजणी 23 मे 2019 दिवशी होणार आहे.