शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली देण्यासाठी काँग्रेस नेते उपस्थितीत राहण्याची शक्यता
तर शिवसेनेकडून आजच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली जाईल अशी शक्यता होती.
महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी-काँग्रेस (NCP-Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. याच दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची पुण्यतिथी आहे. तर शिवसेनेकडून आजच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली जाईल अशी शक्यता होती. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ता स्थापनेला अजून वेळ लागणार असल्याचे विधान केल्यानंतर शिवसेनेत नाराजी दिसून आली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील राजकरणाची समीकरणे बदलेली दिसून येणार आहेत. पुण्यतिथी निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह शिवाजी पार्क मध्ये उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाला श्रद्धांजली देण्यासाठी पोहचणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप मधील अन्य नेते मंडळी सुद्धा उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला राज्यात राजकरणाबाबत बदललेली समीकरणे पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते मंडळी सुद्धा श्रद्धांजली देण्यासाठी येऊ शकतात. महाराष्ट्रात सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये चर्चा सुरु आहेत. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल असे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी नव्या सरकारचे नेतृत्व करावे अशी इच्छा आहे.(Balasaheb Thackeray 7th Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि कशी असेल पार्किंगची व्यवस्था)
तसेच शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दिल्लीत पार पडणारी बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे या दोघांची भेट आता सोमवारी होणार आहे. या बैठकीवेळी राज्यात पक्षाच्या रणनितीबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तर पुण्यात आज शरद पवार यांनी त्यांच्या कोरकमिटीची बैठक बोलावली आहे.