Vinayak Mete's Nephew Commits Suicide: धक्कादायक! शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या
शिवसंग्राम (Shiv Sangram) संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पुतण्याचे निधन झाले आहे. सचिन मेटे (Sachin Mete) असे त्याचे नाव आहे. राहत्या घरातच गळफास घेतलेल्या आवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. तो केवळ 34 वर्षांचा होता. विनाय मेटे यांचे बंधून त्रिंबक मेटे यांचा तो चिरंजीव होता.
बीड जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त येत आहे. शिवसंग्राम (Shiv Sangram) संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पुतण्याचे निधन झाले आहे. सचिन मेटे (Sachin Mete) असे त्याचे नाव आहे. राहत्या घरातच गळफास घेतलेल्या आवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. तो केवळ 34 वर्षांचा होता. विनाय मेटे यांचे बंधून त्रिंबक मेटे यांचा तो चिरंजीव होता. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून त्याने आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारण आहे. याबाबत तपास सुरु केला आहे. पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पंचनामा सुरु असून काही सुसाईड नोट, अथवा इतर काही पुरावे हाती लागतात का याबाबत शोध सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण मेटे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विनायक मेटे यांच्या कुटुंबावर नजिकच्या काळात कोसळलेला हा दुसरा दु:खाचा डोंगर आहे. पाठिमागच्याच वर्षी 14 ऑगस्ट 2022 रोजी स्वत: विनायक मेटे यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय कसेबसे स्वत:ला सावरत होते. इतक्यात आता त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा हे कुटुंब दुख:च्या गर्तेत गेले आहे.
सचिन मेटे यांच्यावर कुणाचा कसला दबाव होता काय, तो काही आजाराने ग्रस्त होता की त्याला इतर काही सवयी होत्या याबाबत चौफेर विचार केला जात आहे. त्याच्या आत्महत्या किंवा मृत्यूच्या कारणाबाबत अद्याप तरी कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती पुढे आली नाही. त्यामुळे सर्व दृष्टीकोणातून पोलिसांना तपास करावा लागणार आहे. त्याच्या शवविच्छेदन अहवालातूनही बऱ्याच गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती जाणूनबुजून स्वतःचे जीवन संपवते तेव्हा आत्महत्येचा मृत्यू होतो. स्वत:चे आयुष्य अनैसर्गिक कृती करुन जबरदस्तीने स्वत:च संपवून घेणे म्हणजे आत्महत्या. आत्महत्या ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या आहे आणि वाचलेल्या कुटुंबांसाठी, मित्रांसाठी आणि समुदायांसाठी एक अतुलनीय शोकांतिका आहे. आत्महत्या अनेकदा मानसिक आरोग्याच्या परिस्थितीशी संबंधित असते, जसे की नैराश्य, चिंता आणि अंमली पदार्थांच्या वापराचे विका. निदान न झाल्यास किंवा उपचार न केल्यास वाढणारे आजार. एकटेपणा, मानसिक धक्का, छळ, आरोप, लज्जा, आपराधीपण अशा अनेक कारणामुळे लोक आत्महत्या करु शकतात.
जगभरामध्ये घडलेल्या आत्महत्येच्या एकूण घटनांपैकी ज्या पीडितांना वेळीच मदत आणि उपचार मिळाले आहेत त्यांचे प्राण वाचण्यात यश आले आहे. समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांनी आत्महत्येसारखेट टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र, त्यांवा वेळीच मदत आणि उपचार भेटल्याने किंवा आयुष्याच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शक भेटल्याने त्यांना आयुष्य जगण्याची पुन्हा एकदा इच्छा झाली. आज ते आनंदाने आयुष्य जगत आहेत. लेटेस्टली मराठीही आमच्या वाचकांना विनंती करते की, काहीही घडले तरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. वेळीच डॉक्टरांचा, आवश्यकता भासल्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत बोला, मन मोकळे करा.