कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना शिर्डी देवस्थानाकडून 10 कोटीची मदत तर सिद्धिविनायक मंदिरकडून पिण्याच्या पाण्याची सोय

तर शिर्डीच्या साई बाबा संस्थानाकडून 10 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Kolhapur Flood (File Photo)

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात मागील काही दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अडीच लाखाहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातील या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता देशा-परदेशातून मदतीचे अनेक हात पुढे येण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातील सामान्यांसोबतच देवस्थानांनी देखील मदत जाहीर केली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तर शिर्डीच्या साई बाबा संस्थानाकडून 10 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Flood: महाराष्ट्र्र पूरग्रस्तांच्या मदतीला धावले बारामतीकर, शरद पवार यांच्या आव्हानावर एका तासात उभारली एक कोटीची मदत

सुरेश हावरे यांनी 10 कोटी रूपयांचा निधी कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहय्यता निधीला देत असल्याचं ट्विट केलं आहे. आर्थिक मदतीसोबतच आता पूर ओसरल्यानंतर आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची टीम तैनात केली जाईल असं म्हटलं आहे. सोबतच काही औषधांचाही पुरवठा दिला जाणार आहे. असं म्हटलं आहे.

सुरेश हावरे यांचे ट्वीट

Water water everywhere, not a drop to drink, is the situation in Kolhapur, Miraj, Sangli areas of Maharashtra. Govt is doing excellent relief work.Saibaba Sansthan Shirdi has decided to extend monetary help of ₹10 crores & kept team of doctors ready with medicines. ॐ साईराम🙏🙏 pic.twitter.com/jCuA9I0bWF

— Dr. Suresh Haware (@sureshhaware) August 10, 2019

पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी तातडीने पोहोचवण्यासाठी सुमारे 11लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तातडीने पूरग्रस्त भागात रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाराऱ्यांच्या समन्वयातून पाणी वाटप केले जाईल अशी माहिती मटाच्या वृत्तामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.