Shirdi Sai Baba Mandir: शिर्डीतील साईबाबा मंदिरात काकड आरतीसाठी 25 हजार देणगीच्या मागणी प्रकरणी विश्वस्तांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
यातच आता एक नवे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Shirdi Sai Baba Mandir: कोरोना व्हायरसमुळे गेल्या 8 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मंदिरे आता भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर ही आता भाविकांसाठी खुले केल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. यातच आता एक नवे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यानुसार साईबाबा मंदिरात काकड आरतीसाठी 25 हजार रुपये देणगीच्या मागणीप्रकरणी विश्वस्तांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.(महाराष्ट्रातील धार्मिळ स्थळे भाविकांसाठी खुली, सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी, तुळजाभवानी मंदिरामध्ये 'हे' असतील महत्त्वाचे नियम)
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आता लागून सुट्ट्या आल्याने भाविकांकडून मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली जात आहे. याच दरम्यान साईबाबांच्या काकड आरतीसाठी 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याचा आरोप काही महिलांकडून करण्यात आला आहे. याबद्दल ABP माझा यांनी ही बातमी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.यावर आता मंदिराच्या विश्वस्तांन प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की,जे भाविक देणगी देतात त्यांना मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शन आणि आरतीची व्यवस्था करुन दिली जाते. परंतु पैसे देऊन आरतीचा पास दिला जातो अशी मागणी कधीच करण्यात आलेली नाही. त्याचसोबत सध्या काकड आरतीसाठी 25 हजारांच्या देणगीबद्दल तक्रारी आल्यास चौकशी केली जाईल असे मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिर्डीतील साईबाबा मंदिरात प्रत्येक दिवसाला 6 हजार भाविकांऐवजी आता 15 हजार जणांना दर्शनासाठी परवानगी दिली गेली आहे. तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी केली जात आहे. मात्र आता लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी केली जातेय.