Maharashtra Government: शिंदे फडणवीस सरकारची सेंच्यूरी पूर्ण; जाणून घ्या सरकारच्या १०० दिवसात फत्ते केलेली काम आणि मोठे निर्णय

तरी शिंदे फडणवीस सरकारने १०० दिवस पूर्ण केले असुन आज सरकारच्या कामकाजाचा १०१ वा दिवस आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

30 जूनला शपथ घेतलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारला 7 ऑक्टोबरला म्हणजे काल 100 दिवस पूर्ण झाले असून आज सरकारी कारभाराचा 101 वा दिवस आहे. काल म्हणजेच सरकार पूर्ण होवू 100 दिवस झाल्यानंतर राज्य सरकारच्या कामगिरीचा तपशील जनतेसमोर मांडण्यात आला आहे. 100 दिवसांच्या प्रगती अहवालासोबतच उद्दिष्टाची माहितीही शेअर (Share) करण्यात आली आहे. तरी या शंभर दिवसात अनेक मोठी आणि रखडलेली काम फत्ते केली असुन विविध मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तरी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) 100 दिवसांच्या सरकारमध्ये फक्त गणपती नवरात्र उत्सवातील कार्यक्रमात हजेरी लावण्याची खोचक टीका शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.

 

शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी सरकारची शपथ घेतल्यानंतर लगेचच सरकारने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमती अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटरने (Liter) कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर जुलैमध्ये (July) नियमितपणे कर्ज भरणाऱ्या 13.87 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन जाहीर करण्यात आले. तर शपथ घेतलेल्या 18 कॅबिनेट मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत (Cabinet Ministry Meeting) सरकारने जाहीर केले की ते पूरग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) द्वारे देऊ केलेल्या दुप्पट नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली, असे विविध महत्वाचे निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतले. पण या निर्णयांमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 6,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडला आहे. (हे ही वाचा:- 'जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला, साहेबांनी त्यांना कधीच दूर केले होते'; उद्धव ठाकरेंच्या बहिणीची टीका)

 

तसेच मुंबईसाठी शिंदे फडणवीस सरकार कडून काही मोठे निर्णय घेण्यात आले. यांत महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने निविदा मागवण्याचा आणि प्रकल्पासाठी अतिरिक्त लाभ देण्याचा निर्णय घेतला. याचप्रमाणे पाच लाख शेतकऱ्यांसाठी 755 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट, महाराष्ट्र पोलिस गृह कर्ज, आरे जंगलातील मेट्रो ३ कारशेड या सारखे अनेक मोठ मोठे निर्णय घेतले. तरी  कमी दिवसात सगळ्यात जास्त शासन निर्णय काढण्याचा रेकॉर्ड शिंदे फडणवीस सरकारने तोडला आहे.