Shimga Utsav 2022: कोकणात मोठ्या उत्साहात शिमगा सणाला सुरूवात

कोकणात विशेषत: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.

Holika Dahan 2019 (Representational Image/ Photo Credit: Facebook)

कोकणातील (Konkan) मोठा सण शिमगोत्सवाला (Shimga Festival 2020) सुरुवात झाली आहे. कोकणात विशेषत: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. या मंदीरात सर्व गावकरी एकत्रित येऊन, पुढील नऊ दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन करतात. शिमग्यासाठी सर्व चाकरमानी गावाला जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Welcome To #Konkan_Tourism (@yeva.konkan.aaploch.aasa)

यंदा 17 मार्च रोजी होळी असून 18 मार्च रोजी धुलीवंदन साजरा केला जाईल. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. (हेही वाचा Konkan Shimga Festival Celebration: कोकणातील होळी सण, पालखी नाचवणं, दशावतार यांनी आठवडाभर रंगतो शिमगोत्सव!)

आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात 'जती'च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif