N. D. Patil: शेकाप नेते एन डी पाटील यांच्यावर कोल्हापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाटील (N. D. Patil ) अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या पार्थीवावर कोल्हापूर (Kolhapur) येथील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला.

N D Patil | (Photo Credits: You Tube)

शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksha) ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील (N. D. Patil ) अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या पार्थीवावर कोल्हापूर (Kolhapur) येथील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि पुरोगामी चळवळीतील नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तमाम डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील एक अग्रनिशेच शिलेदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते अशी एन. डी. पाटील यांची ओळख होती. मात्र त्याही पलीकडे एक विचारवंत, प्रभावी वक्ते आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता अशीही त्यांची ओळख होती. त्यांचे जवळचे नातेवाईक राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या पदांवर आणि ततक्याच व्यापक स्वरुपात कार्यरत होते. असे असले तरीही त्यांना कधीही सत्तेची अथवा सत्तेच्या जवळकीची स्वप्ने पडली नाहीत. ते आयुष्यभर सर्वसामान्यांच्याच प्रश्नांसोबतच एकनिष्ठ राहिले. (हेही वाचा, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना)

एन. डी. पाटील यांच्या पार्थीवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठई राज्यभरातून विविध मान्यवर कोल्हापूर येथे दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एनडी पाटील यांच्या पत्नी सरोजा उर्फ माई आणि मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांचे सांत्वन केले. या वेळी एन.डी. पाटील यांच्याविषयीच्या आठवणींनी अनेक जण गहीवरले.