Sheetal Mhatre Morphed Video Case: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात; 4-5 जण अटकेत

सोबतच त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीमध्येही काम केले आहे.

sainath Durge With Aaditya Thackeray | Facebook

शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. आक्षेपार्ह मेसेजसह फिरणारा हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा आहे. दरम्यान विधिमंडळामध्ये आज या व्हिडिओ वरून वातावरण तापलेलं पहायला मिळालं. शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केल्याप्रकरणी सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणामध्ये आता सभागृहाबाहेरही काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, या व्हिडिओ प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या एका पथकाने त्यांना थेट दहिसर पोलिस स्टेशन मध्ये नेले असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये 4-5 जणांना अटकही झाल्याचं समोर आलं आहे.

प्रकाश सुर्वे हे शिवसेनेचे आमदार आहेत. सत्तांतराच्या नाट्यानंतर प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यापाठोपाठ काही दिवसांतच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे देखील त्यांना सामील झाल्या. त्यानंतर शिंदे गटाकडून अनेकदा शीतल म्हात्रे ठाकरे गटावर घणाघात करताना दिसल्या आहे. ठाकरे गटाच्या अनेक आरोपांना त्या सोशल मीडीयातून व्हिडिओ द्वारा उत्तर देताना दिसल्या आहेत. आता त्यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबतच एक आक्षेपार्ह व्हिडिओ फेसबूकश अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर वायरल होत आहे.  याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी काल रात्री उशिरा पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 'मातोश्री' या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी  प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेदेखील तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी काल रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले आहे. सोबतच 4-5 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडीयामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओत काही राजकीय मोटिव्ह आहे का? याचा तपास करण्यासाठी साईनाथ दुर्गे यांच्याकडून काही माहिती मिळते का? हे पोलिस चौकशीमध्ये समोर येईल.

शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया

साईनाथ दुर्गे युवासेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. सोबतच त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीमध्येही काम केले आहे.