Lockdown: एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन जोडप्याचा नागपूर ते मध्य प्रदेश सायकल प्रवास

कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकून आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, मोठ्या संख्येत लोक कोरोना विषाणूची झुंज देत आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा (Lockdown) पर्याय निवडला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकून आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, मोठ्या संख्येत लोक कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा (Lockdown) पर्याय निवडला आहे. यात भारताचाही समावेश आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन घोषीत केले होते. मात्र, कोरोनाचा विषाण वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शहरात अडकून पडलेल्या अनेकांना अधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकजण आपपल्या घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा स्वीकार करू लागले आहेत. यातच नागपूर (Nagpur) येथे राहत असलेल्या एका प्ररप्रांती जोडप्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्यासोबत मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनी (Siwni) गाठण्यासाठी सायकल वरून प्रवास सुरु केला आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. 170 हून अधिक देश कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. सध्या भारतातही कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने प्रशासनापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. संपूर्ण देशात कोरोनाचे जाळे वेगाने पसरत चालले आहेत. तसेच नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. दरम्यान, शहरात अडकून पडलेल्या लोकांचे मोठे हाल होत असल्याचे दिसत आहे. यातच आपल्या घरी परतण्यासाठी एका जोडप्याने एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन सायकल प्रवास सुरु केला आहे. हे जोडपे मूळचे मध्य प्रदेशातील सिवनी गावातील रहवासी असून ते नागपूर येथे कामानिमित्त नागपूर येथे दाखल झाले होते. देशात लॉकडाउन घोषीत झाल्यानंतर त्यांना अनेक संकटाला सामोरे जावा लागत होते. यामुळे त्यांचे लक्ष 14 एप्रिलकडे लागले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन 3 मे पर्यंत कायम ठेवण्यात आले. यामुळे संबंधित जोडप्याने चक्क सायकलवरून गाव गाठायला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- विरोधकांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी उद्धव 'Resign' ही संकल्पना वास्तवात येणार नाही- संजय राऊत

एएनआयचे ट्वीट-

India Lockdown : सूरत मध्ये मास्क लाऊन जोडप्याने केल लग्न; मास्क, सॅनिटायझर आणि हात मोज्यांचा वापर : Watch Video 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.