पतीसोबत अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळे दहा लाख रुपये

पिंपरी चिंचवड येथे एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन पतीसोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

पिंपरी चिंचवड येथे एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन पतीसोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमोल गायकवाड आणि सोनाली गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. अमोलने त्याचे लग्न झाले असून एका 29 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवून अत्याचार केले.तसेच अमोलच्या पत्नीने या दोघांचे फोटोसुद्धा काढले होते. या फोटो वरुन नंतर त्या तरुणीला त्रास देत दहा लाख रुपये उकळले आहेत.

तर या पीडित तरुणीने अमोलच्या घरी जाऊन फोटो डिलिट करण्यास सांगितले. मात्र अमोल आणि सोनालीने फोटो डिलिट करणार नसल्याचे सांगत पैसे उकळले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून कारवाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement