Share Market: केंद्राचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी, सेनसेक्स 406 अंकानी खुलला

तत्पूर्वी मुंबईतील शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याचे दिसून आली आहे.

Mumbai Share Market | File Photo

Share Market: केंद्राचा आज अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत सकाळी 11 वाजता सादर करणार आहेत. तत्पूर्वी मुंबईतील शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याचे दिसून आली आहे. तर आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेनसेक्स 406.59 अंकानी उघडून तो 46,692.36 वर पोहचला. याच प्रमाणे निफ्टी सुद्धा 129.55 अंकानी खुलला असून 13.764.15 वर स्थिरावला गेला आहे. शेअर मार्केटमध्ये तेजी आली असली तरीही काहीश्या प्रमाणात चढउतार पहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु आता सर्वांचे लक्ष निर्मला सीतारमण सादर करणाऱ्या बजेटकडे लागून राहिले आहे.(Union Budget 2021 Live Updates In Marathi: 'bahi khata' ऐवजी टॅबच्या माध्यमातून अर्थमंत्री वाचणार बजेट)

याआधी गेल्या शुक्रवारी सातत्याने सहाव्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले होते. त्यावेळी सेनसेक्स 588 अंकांनी तर निफ्टी 183 अंकांनी घसरला होता. तर आज सादर होणाऱ्या बजेटपूर्वी शेअर बाजारात तेजी आल्याने गुंतवणूकदारांना यंदाच्या अर्थसंकल्पाबद्दल खुप अपेक्षा आहेत. मोदी सरकारने गेल्या सात वर्षात बजेट नंतर शेअर बाजारात तेजी आली किंवा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. बजेटच्या दिवसाबद्दल बोलायचे झाल्यास मोदी सरकारच्या 7 अर्थसंकल्पापैकी 5 वेळा शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसले होते.(Union Budget 2021: बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी; केंद्र सरकार डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत)

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि खास असणार आहे.कारण अर्थमंत्री निर्मला सीतारमण या तिसऱ्यांदा बजेट सादर करणार आहे. त्याचसोबत कोरोना व्हायरसच्या महासंकट काळात यंदाच्या बजेटला अधिक महत्व असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. तसेच बजेट यंदा पेपरलेस असणार असल्याने त्यामध्ये विविध क्षेत्रासाठी काय तरतूदी असणार हे जाणून घेण्यासाठी त्याची सर्वांकडून वाट पाहिली जात आहे.