IPL Auction 2025 Live

Praful Patel On Sharad Pawar: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य; 'शरद पवार विरोधी चेहरा आणि पंतप्रधानपदाचे उमेदवारही नसतील'

ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते, नाहीत आणि कधीच नसतील. शरद पवार हे विरोधकांचा चेहरा नाहीत, असे स्पष्ट शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Sharad Pawar, Praful Patel (PC - Facebook)

Praful Patel On Sharad Pawar: राजधानी दिल्लीतील (Delhi) तालकटोरा स्टेडियम (Talkatora Stadium) वर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन (NCP National Convention) पार पडले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते, नाहीत आणि कधीच नसतील. शरद पवार हे विरोधकांचा चेहरा नाहीत, असे स्पष्ट शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, देशातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी भूमिका बजावायची असून त्यात शरद पवार मोठी भूमिका बजावणार आहेत. शरद पवार हे अशी व्यक्ती आहे की, ज्यांच्या मदतीने आपण सशक्त भूमिका बजावू शकतो आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी कार्य करू शकतो. (हेही वाचा - Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीपूर्वी Shiv Sena यूपीमध्ये संघटन मजबूत करण्याच्या तयारीत; 30 जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा)

केसीआर, स्टॅलिन, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, चौटाला आणि काँग्रेसचे नेते शरद पवारांकडे येतात. यामागे पवारांची दूरदृष्टी आहे. ते सर्व पक्षांना एकत्र आणू शकतात. पटेल यांच्या या मुद्द्याला केरळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष पीसी चाको यांनीही पाठिंबा दिला.

दरम्यान, मुंबई दौऱ्यावर गेलेल्या केसीआर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि दिल्ली दौऱ्यावर आलेले नितीश कुमारही पवारांना भेटण्यासाठी पोहोचले होते.