Devendra Fadnavis on Thackeray and Pawar: शरद पवार यांनी डबल गेम केला, उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला- देवेंद्र फडणवीस

तो फिरवला. त्यांनी 'डबल गेम' करुन आमची दिशाभूल केली आणि पुढे निघून गेले. पण, उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपलसा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis,Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रथमच अजिच पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवर काहीसे विस्तारीत भाष्य केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची 'हिस्टरी' समजून घेतली तर त्या शपथविधीबद्दलची 'मिस्ट्री' समजू शकेल. आम्ही 2019 ची निवडणूक युतीत लढलो. मात्र, निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी आमचे फोनही उचलणे बंद केले. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेसाठी पर्यायांवर विचार करत होतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांनी आम्ही भाजपसोबत सत्तेत यायला तयार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी शरद पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या. परिणामी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झाला. शरद पवार यांचे समजू शकतो. ते विरोधक होते आणि त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे त्यांनी आमचा वापर केला आणि पुढे गेले. पण, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका देवेंद्र फडणीस यांनी केली आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार सुरु केला. त्यांनी आमचे फोन घेणेही बंद केले. त्यामुळे आम्ही पर्यायांवर विचार सुरु केला. तेव्हा राष्ट्रवादीतील काही लोकांनी आम्ही (NCP) सोबत यायाल तयार आहोत असे सांगितले. आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. माझ्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करायचे ठरले. तसेच, आम्हा दोघांना सर्व अधिकार देण्यात आले. त्यानुसार आम्ही हालाचाली सुरु केल्या. (हेही वाचा, Court Summons Uddhav Thackeray, Sanjay Raut: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना शिवडी कोर्टाचे समन्स, 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश)

शरद पवार यांच्यासोब अनेक बैठका पार पडल्या होत्या. त्यामुळे सर्व खात्रीनेच सुरु होते. मात्र, पुढे शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी निर्णय बदलला. त्यांनी महाविकासआघाडी करुन उद्धव ठाकरे यांना सोबतघेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्णय बदलला. पण अजित पवार यांना ते शक्य नव्हते. कारण सर्व तयारी झाली होती. त्यांना परत फिरणे शक्य नव्हते. त्यातूनच आम्ही शपथविधी केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेले सरकार शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच स्थापन करण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी जोर देऊन सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांनी खंजीर खुपसला का? असा थेट सवाल केला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाही.असे म्हणता येणार नाही. शेवटी ते आमचे विरोधकच होते. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी निवडणुक झाल्यावर सत्तास्थापन करण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यायचा शब्द दिला. तो फिरवला. त्यांनी 'डबल गेम' करुन आमची दिशाभूल केली आणि पुढे निघून गेले. पण, उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपलसा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.