Shantanu Naidu ने 'Goodbye, my dear lighthouse' म्हणत गुरू Ratan Tata यांना अर्पण केली श्रद्धांजली; पहा हा टाटांचा अवघ्या 29 वर्षांचा मॅनेजर कोण?
काही वर्षांपूर्वी शांतनू सोबत एका वाढदिवस सेलिब्रेशनाचा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल झाला होता. तेव्हापासून शांतनू आणि रतन टाटांच्या मैत्रीचं कौतुक होत आहे.
रतन टाटा (Ratan Tata) यांनी मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये काल 9 ऑक्टोबर दिवशी अखेरचा श्वास घेतला. भारतातील एक नामवंत उद्योगपती, दिलदार व्यक्तीमत्त्व, पाळीव प्राण्यांप्रतीही कणव असलेले रतन टाटा यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. टाटा समुहाचा विस्तार करत समाजाप्रति असलेलं देणं जपताना त्यांनी अनेकांना जोडलं. त्यापैकीच एक म्हणजे Shantanu Naidu. टाटांचा सर्वात तरूण मॅनेजर शांतनू याची टाटांसोबतची जवळीक अनेक वायरल व्हीडिओंमधून समोर आली आहे. आज त्यांच्या निधनानंतर शांतनूने देखील भावूक होत सोशल मीडीयामध्ये 'Goodbye, my dear lighthouse' म्हणत गुरू Ratan Tata यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
2018 पासून, शांतनू नायडू रतन टाटा यांचे व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जबाबदाऱ्या आणि उपक्रम त्याने हाताळले आहेत. Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? कोणाकडे जाणार 3800 कोटींची मालमत्ता? वाचा सविस्तर .
कोण आहे शांतनू नायडू?
नायडू हा 2014 साली पुण्याच्या Savitribai Phule Pune University मधून Mechanical Engineering चा पदवीधर झाला. अमेरिकेत त्याने नंतर Cornell Johnson Graduate School of Management मधून एमबीए केले. Hemmeter Entrepreneurship Award मिळाले आहे. पुण्यात त्याने Tata Elxsi मध्येही काम केले.
रतन टाटा आणि शांतनू नायडू कसे भेटले?
शंतनू यांनी Tata Elxsi सोबतच्या कार्यकाळात भरधाव वेगातील वाहनांमुळे कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा पुढे केला होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रेरित होऊन त्याने ‘कुत्र्यांसाठी कॉलर’ ची कल्पना पुढे आणली. ज्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे नसतानाही त्यांची दृश्यमानता वाढेल आणि गाडी खाली येऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होईल. वडिलांच्या सांगण्यावरून नायडूने टाटांना पत्र पाठवत या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. टाटांनीही त्याच्या पत्राची दखल घेत आपला अभिप्राय कळवला. त्याला या कामामध्ये मदत केली. 'श्वानप्रेमा'मधून त्यांचं नातं जुळलं पुढे शांतनूला त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम दिले. हा स्नेह केवळ एका प्रोजेक्ट पुरता मर्यादित राहिला नाही. नंतर त्यांनी शांतनूला स्वतःसोबत काम करण्याचीही
काही वर्षांपूर्वी शांतनू सोबत एका वाढदिवस सेलिब्रेशनाचा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल झाला होता. तेव्हापासून शांतनू आणि रतन टाटांच्या मैत्रीचं कौतुक होत आहे. शांतनू नायडू याची गुडफेलोज कंपनी आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ती काम करते. या कंपनीमध्येही रतन टाटा यांनी गुंतवणूक केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)