Lata Mangeshkar: शाहरुख खान लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला नाही, फुंकला… जाणून घ्या इस्लाममध्ये याचा अर्थ काय?
हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले, त्यामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक आहे. देशाच्याच नव्हे तर जगभरातील लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, त्यांचे पार्थिव मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले होते, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) राजकारण, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूड स्टार शाहरुख खानही (Shahrukh Khan) तिथे पोहोचला. लता मंगेशकरयांना श्रद्धांजली देताना शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
Tweet
शाहरुखने थुंकला नाही, तर फुंकला
काल लता दीदींच्या पार्थिवासमोर शाहरुख जेव्हा दोन्ही हात पसरून प्रार्थना करत होता. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क होता. त्याने सुमारे 12 सेकंद प्रार्थना केली आणि नंतर तोंडावरचा मास्क काढून टाकला. मास्क काढल्यानंतर त्याने किंचित वाकून लतादीदींच्या अंगावर फुंकर मारली. इस्लामिक धर्माच्या अनुशंगाने ही खूप मोठी गोष्ट आहे. तसेच ही गोष्ट तुम्हाला एखाद्या मस्जिद किंवा दर्गात पाहायला मिळते. आई-वडिल आपल्या मुलांसाठी मौलाना यांच्याकडून प्रार्थना करतात. हे मोठ्या लोकांसाठी सुध्दा होऊ शकतं. तसेच अशी प्रार्थना कोणत्याही माणसासाठी केली जाऊ शकते.
Tweet
इस्लाममध्ये काय महत्त्व आहे?
दुआ पठणानंतर फुंकण्याचे खूप महत्त्व आहे. हा देखील प्रार्थनेचा एक भाग आहे. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी इस्लाममध्ये दुआ पाठ केले जाते. शाहरुखनेही दुआ पठणानंतर हात जोडुन फुंक मारली. ते म्हणतात की आई-वडिल आपल्या मुलांना घराबाहेर पाठवताना आशीर्वाद देतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर अनेकदा फुंक मारतात, जेणेकरून अल्लाह त्यांच्या मुलांचे रक्षण करेल आणि त्यांना वाईट शक्तींपासून दूर ठेवेल. (हे ही वाचा
त्यांनी सांगितले की लहानांसाठी फक्त मोठेच हे करत नाहीत. त्यापेक्षा ज्यांच्याबद्दल मनात खूप आदर असतो, खूप पूज्यभाव असतो, त्यांच्यासाठी लहान सुद्धा नमाज पठण करतात आणि नंतर फुंकतात. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, स्वर्गाचा आशीर्वाद मिळावा, देव किंवा अल्लाहच्या आश्रयस्थानात स्थान मिळावे यासाठी ही प्रार्थना केली जाते.