धक्कादायक : 45 वर्षीय महिलेकडून 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

मुंबई येथील वांद्रे परिसरात एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा, 45 वर्षीय महिलेकडून लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

मुंबई येथील वांद्रे परिसरात एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा, 45 वर्षीय महिलेकडून लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर, रविवारी या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून, लवकरच या महिलेला न्यायालयात हजर केले जाईल. पिडीत मुलगा आपल्या आईला भेटण्यासाठी वांद्रे परिसरात गेला असता, शेजारी राहणाऱ्या महिलेने या मुलाला घरी बोलावून त्याचा विनयभंग केला. हा मुलगा अल्पवयीन असल्याचे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसून, पुराव्यासाठी लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.

पिडीत मुलाच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे. हा मुलगा त्याच्या वडिलांकडे राहतो तर, त्याची इतर भावंडे आईकडे राहतात. मात्र घटस्फोटानंतरही भावंडांमध्ये प्रेम राहावे म्हणून, हा मुलगा त्याच्या आईला आणि भावंडांना भेटण्यासाठी वांद्र्याला येत असे. असाच हा मुलगा आला असता शेजारी राहणाऱ्या या 45 वर्षांच्या महिलेने त्याला घरी बोलावून घेतले. हा मुलगा या महिलेला ओळखत असल्याने तो तिच्या घरी गेला.  त्यावेळी महिलेने या मुलाचा लैंगिक छळ केला. (हेही वाचा : पुण्यात चार मुलांचा विनयभंग; ‘गुड टच, बॅड टच’ शिकवताना अश्लील स्पर्श, शिक्षकाला अटक)

मुलाचे वडिल जेव्हा त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी त्यांना मुलगा निराश दिसला. त्यांनी मुलाला निराशेचे कारण विचारले तेव्हा तो काही बोलला नाही. मात्र विश्वासात घेऊन त्याला विचारले असता त्याने घडलेली हकीकत सांगितली. वडिलांनी ताबडतोब या महिलेविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोस्को कायद्यातंर्गत पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement