पुणे येथे Massage Centre मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीला अटक
या प्रकरणी एसएसबी यांच्या संघटनेने हे सेक्स रॅकेट (Sex Racket) उधळून लावत एका आरोपीला अटक केली आहे.
Pune: पुण्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी एका मसाज सेंटर (Massage Centre) मध्ये सेक्स रॅकेट चालविले जात होते. या प्रकरणी एसएसबी यांच्या संघटनेने हे सेक्स रॅकेट (Sex Racket) उधळून लावत एका आरोपीला अटक केली आहे. तसेच रेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या सहा मणिपुर आणि नागालँड येथील तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी मसाज सेंटर मालक सोमनाथ बानवरीलाल केडिया या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांना सूत्रांकडून पुण्यातील प्रसिद्ध मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची टिप मिळाली होती. तसेच मसाज सेंटर मधील हे सेक्स रॅकेट स्विडिश आणि थायलंड येथील एका व्यक्तीकडून चालविले जात होते. तर पोलिसांना मसाज सेंटरवर धाड टाकण्यापूर्वी या गोष्टीची निश्चितता करण्यापूर्वी मसाज सेंटरमध्ये खोटा ग्राहक म्हणून माहिती जमा केली. त्यानंतरच पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या सेंटरवर धाड टाकण्यात आली. (हेही वाचा-नालासोपारा: व्हॉट्सअॅपवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलालासह चार विवाहीत महिला अटकेत)
'स्पा हेवन, लक्झरी स्विडिश आणि थाय मसाज सेंटर' हे पुण्यातील कल्याणी नगर येथील फोर्ट लिझा सोसासटी येथे आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस आणि एसएसबी यांच्याकडून लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार आहे. सेक्स रॅकेटमधील सुटका केलेल्या तरुणींना जबरदस्तीने या गोरखधंद्यात ढकलण्यात आले होते. तसेच या सेक्स रॅकेटमध्ये तीन महाराष्ट्रीन, दोन मणिपूर व एक नागालँड येथील तरुणीची सुटका करण्यात आली आहे.