लिंग बदलून पुरुष बनलेला बीडचा ललित साळवे अडकला लग्नाच्या बेडीत

औरंगाबादला मुलगी बघण्यासाठी गेलेल्या ललितने छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपला लग्न सोहळा पार पाडला आहे.

Police Constable Lalit Kumar Salve got married (PC - Twitter)

शरीरातील बदलामुळे 2 वर्षापूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया (Sex Change Operation) केलेला ललिता साळवेचा ललित कुमार (Lalit kumar) बनलेला तरुण अखेर विवाह बंधनात (Marriage) अडकला आहे. औरंगाबादला मुलगी बघण्यासाठी गेलेल्या ललितने छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपला लग्न सोहळा पार पाडला आहे. माजलगाव तालुक्यातल्या राजेगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ललिता 2010 मध्ये महिला कर्मचारी म्हणून पोलीस खात्यात रुजू झाली. परंतु, शरीरातील बदलानंतर ललिता लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ललित कुमार झाली. त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली. त्यानंतर ललित यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ललित साळवे यांनी लिंग बदलाच्या प्रकरणात राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. सोमवारी ललित कुमार यांनी सीमा नावाच्या मुलीशी लग्न करून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ललितने आपल्या पत्नीला आपला संपूर्ण संघर्ष आणि शस्त्रक्रियेसंबंधी माहिती दिली आहे. (हेही वाचा - Shiv Jayanti 2020: दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव सोहळ्यात 10 देशांचे राजदूत सहभागी होणार)

ललिता पोलीस दलात कार्यरत असताना त्याच्या शरीरात अचानक बदल जाणवू लागले. त्यामुळे ललिताने लिंग बदलाचा निर्णय घेतला. ललितावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर ललिताचा ललित साळवे झाला. ललितवर झालेल्या या शस्त्रक्रियेची देशभर चर्चा झाली. सोमवारी ललित कुमार विवाहबंधनात अडकला. सध्या सोशल मीडियावर ललितच्या विवाह सोहळ्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.